जेऊर ( ता.करमाळा ) येथे एकल महिला मेळावा संपन्न

टीम : ईगल आय मीडिया
महिलांनी स्वतः पुढे येउन शासकीय योजनांचा लाभ करून घ्यावा असे आवाहन करमाळा तालुक्याचे तहसीलदार समीर माने यांनी केले. ते जेऊर येथे आयोजित एकल महिला मेळाव्यात बोलत होते.
तहसीलदार समीर माने पुढे म्हणाले की, महिलांनी स्वतः सर्व योजनांची माहिती करून घ्यावी व स्वतः पुढे येऊन शासकीय योजनांचा उपयोग करून घेतला पाहिजे. तरच महिलांची प्रगती होईल. तहसीलदार यांच्या हस्ते एकल महिला व बचत गटांच्या महिलांसाठी रोजगार मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी अविनाश थोरात, विस्तार अधिकारी पंचायत समिती करमाळा यांनी विविध घरकुल योजना व त्याची अंमलबजावणी याबाबत महिलांना माहिती दिली. उमेद स्वयंसहायता समूह प्रकल्प प्रमुख पंढरीनाथ ठाणगे यांनी बचत गट निर्मिती व महिलांच्या विकासासाठी बचत गटांचा उपयोग यावर मार्गदर्शन केले. उमाकांत पडवळ यांनी स्वयंरोजगारराच्या विविध योजना व प्रशिक्षण याबाबत माहिती देऊन या योजनांची माहिती देऊन महिलांना विविध प्रकारच्या प्रशिक्षणा मार्फत रोजगार निर्मिती याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रम आयोजित करण्या पाठीमागची भूमिका व उद्देश याबाबत ॲड. सविता शिंदे यांनी प्रास्ताविकात माहिती दिली.
कार्यक्रमात विविध शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सहभागी होऊन वेगवेगळ्या शासकीय योजनांचे फॉर्म प्रत्यक्षरित्या महिलांकडून स्वीकारले. रेशनिंग व्यवस्था, आधार कार्ड, संजय गांधी निराधार योजना, वृद्धापकाळ योजना इत्यादी बाबतच्या महिलांच्या समस्या प्रत्यक्षरीत्या सोडवण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमांमध्ये जेऊर व परिसरातील आठशे ते नऊशे महिलांनी भाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया कर्णवर यांनी केले. माया कदम यांनी आभार मानले. पुष्पा कर्चे, वैशाली घोडके, अंजना साळुंखे, वंदना घोडके, मनिषा ठोंबरे, आशा चांदणे, मनीषा साळवे, गायत्री कुलकर्णी, शारदा सुतार तसेच ग्रामपंचायत जेऊर चे पदाधिकारी व कर्मचारी इत्यादींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.