पंढरपूर सिंहगडमध्ये १०३ विद्यार्थ्यांचे रक्तदान

रोटरी क्लब पंढरपूर, राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने रक्तदान शिबीर संपन्न

फोटो ओळी –  
पंढरपूर सिंहगड मध्ये आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदान करताना विद्यार्थी 

पंढरपूर : eagle eye news

 सिंहगड  अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या  राष्ट्रीय सेवा योजना व पंढरपूर रोटरी क्‍लबच्यावतीने  बुधवार ( दि.  २९ मार्च  ) रोजी  रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १०३ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा रोटरी क्लब अध्यक्ष डॉ. कैलाश करांडे, सिंहगड काॅलेजचे डीन डाॅ. चेतन पिसे, डॉ. उदय पाटील, प्रा. निशा करांडे, प्रा. गणेश लकडे, प्रा. अमोल कांबळे, प्रा. अजय मासाळ, विद्यार्थी प्रतिनिधी नागेंद्रकुमार नायकुडे यांच्या हस्ते करण्यात आले.

 राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आल्याचे यावेळी प्रा. करांडे यांनी सांगितले.

  हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अक्षय ब्लड बॅकेचे जनसंपर्क अधिकारी अजय रूपनर, स्वप्नील शिंदे, विष्णु मोरे, निकीता गावडे, तुळशीदास आयगोळे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख, विद्यार्थी प्रतिनिधी नागेंद्रकुमार नायकुडे, बापु माने सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांसह रोटरी क्लबच्या सदस्यांनी  परीश्रम घेतले.

Leave a Reply

error: Content is protected !!