पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरींग ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु

पंढरपूर : ईगल आय मीडिया

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रथम व थेट व्दितीय वर्ष इंजिनिअरींग शिक्षणासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात बुधवार दि. ९ डिसेंबर २०२० पासून सुरु झाली असून हि प्रवेश प्रक्रिया कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी घेऊन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात सोशल डिस्टेंसिंग, सॅनिटायझर आणि मास्कचा नियमित वापर करून प्रवेश प्रक्रिया होत आहे.

पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरींग (१२०), इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग (६०), इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग (६०), सिव्हिल इंजिनिअरींग (६०), कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग इंजिनिअरींग (६०), या अभ्यासक्रमाची अ‍ॅडमिशन चालू झाली आहे.

या बाबतची माहिती अथवा अभियांत्रिकीच्या प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांना व पालकांना काही अडचण आल्यास अथवा अधिक माहितीसाठी प्रा. अनिल निकम- 9423741150, प्रा. सोमनाथ कोळी -8378017546, प्रा. रविंद्र टाकळीकर- 9765101510, प्रा. उमेश घोलप- 8055103715, प्रा. विक्रांत जुंदळे- 9403078284 तसेच 02186-250146 नंबर वर फोन करून प्रवेशाबद्दल माहिती घेण्याचे आवाहन पंढरपूर सिंहगड कॉलेज कडून करण्यात आले आहे.

इंजिनिअरींग शिक्षणासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाची माहिती महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर सविस्तर उपलब्ध झाली आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे. या प्रवेश प्रक्रियेचा लाभ अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!