

पंढरपूर : ईगल आय मीडिया
भारतातील अद्विक हायटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील ११ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड करण्यात आली असल्याची माहिती ट्रेनिंग ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे यांनी दिली.
अद्विक हायटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जगात नामांकित आहे. अशा या कंपनीत एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील संदीप चिकणे, शेखर देठे, गायत्री पाटील या विद्यार्थ्यांना ३ लाख पॅकेज मिळाले असून मयुरी बिले, प्रताप चव्हाण, प्रशांत नागटिळक, प्रियांका ननवरे, दुर्गा वठारे, स्वप्निल कापणे, स्वप्निल जगताप, प्रवीण थिटे आदी विद्यार्थ्यांना वार्षिक १.८ लाख पगार कंपनीकडून मिळणार आहे.
या विद्यार्थ्यांची निवड पंढरपूर सिंहगड कॉलेज मध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हूवद्वारे मधून निवड करण्यात आली आहे. पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये विद्यार्थ्याचे कौशल पाहून शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांना आवड असलेल्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी पंढरपूर सिंहगड मध्येच असल्याने आज हजारो विद्यार्थी मोठ-मोठ्या जगातील नामांकित कंपनीत, सरकारी नोकरी तसेच काही जण स्वतःचा व्यवसाय उभा करून लाखों रुपये मिळवीत आहे.
सेन्ट्रल प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. जयप्रकाश पिंताबरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ.अल्ताफ मुलाणी, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा. भारत अदमिले, प्रा. विनायक पाटील आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-र्यानी अभिनंदन केले.