पदवीधर शिक्षिका सुनीता गवळी यांचा सेवापुर्ती समारंभ
photo पदवीधर शिक्षिका सुनीता गवळी यांच्या सेवापुर्ती सत्कार समारंभ प्रसंगी सीमा परिचारक, जि प सदस्य वसंत नाना देशमुख,DVP उद्योग समूहाचे एमडी अमर पाटील, पल्लवी यलमार, लहू कांबळे, प्रशांत वाघमारे, सरपंच धनश्री साळुंखे, उपसरपंच सोमनाथ पोरे कविता पोरे,मुख्याध्यापक रवींद्र भालेराव
पंढरपूर : ईगल आय न्यूज
आयुष्यभर विद्यार्थ्यांप्रती असलेले शिक्षकांचे समर्पणच सेवापूर्तीचा खरा आनंद द्विगुणित करून, निवृत्तीनंतरच आयुष्य सफल करते, असे मत सीमा परिचारक यांनी व्यक्त केले. वाखरी जिल्हा परिषद शाळेच्या पदवीधर शिक्षिका सुनिता महादेव गवळी यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या बोलत होत्या. वाखरी केंद्रातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिक्षकांच्या वतीने श्रीमती सुनिता गवळी यांचा सेवापुर्तीचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना मा. जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख यांनी, आयुष्यभर शिक्षकांच्या प्रश्नासाठी खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन केले. डीव्हीपी उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमर पाटील यांनी सुनिता गवळी यांच्या कार्याचा गौरव केला. शिक्षणविस्तार अधिकारी मारुती लिगाडे, विस्तार अधिकारी डॉ.बिभीषण रणदिवे यांनी गवळी यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पंचायत समिती सदस्य पल्लवी यलमार, राज्य शिक्षक संघाचे सल्लागार लहू कांबळे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघमारे, विजय लोंढे, सुनील आडगळे, शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सुनील कोरे , शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय येडगे, आदर्श शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष बापू मिसाळ, शिक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष भोसले, जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष रियाज मुलानी, वस्तीशाळा शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय हेगडे, संघाचे सरचिटणीस प्रशांत ननवरे, पेन्शनर संघटनेचे प्रतिनिधी भानुदास शिंदे, रेखा कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक प्रशांत वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन अश्विनी तावसकर, आशा गाडे, रेखा कांबळे तर आभार पुरुषोत्तम आयरे व राजाभाऊ पवार यांनी मांनले.
यावेळी वाखरी गावच्या सरपंच धनश्री साळुंखे, उपसरपंच सोमनाथ पोरे, स्मिता अधटराव, वाखरी केंद्रातील सर्व शिक्षक व शिक्षिका, कविता पोरे, वर्षा पवार , दिपाली शिंदे,लोखंडे सलगर, पांढरे, लेंगरे, नगरसेवक सचिन शिंदे, वस्ताद औदुंबर शिंदे, ग्रामसेवक शिंदे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्य विद्यार्थी, पालक, व मोठ्या संख्येने नातेवाईक उपस्थित होते.