सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसी च्या वतीने पंढरीत गाजर दाखवा आंदोलन !

टीम : ईगल आय मीडिया


सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्यावतीने शिवाजी चौक येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘गाजर दाखवा’ आंदोलन घेण्यात आले.

भाजप सरकारने देश बेरोजगारीच्या खाईत ढकलला व त्यांना फक्त गाजर दाखवण्यात आले. या सर्वसामान्य माणसांनचे या महागाई मुळे कंबरडे मोडले आहे, महागाईच्या खाईत ढकलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता.

हा दिवस बेरोजगार दिवस व आश्वासनांचे गाजर दाखवा दिवस म्हणून सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाने उपहासात्मक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात गाजर दाखवून आंदोलन करण्यात आले.

यामध्ये सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसी अध्यक्ष समीर कोळी,जिल्हा युवक कार्याध्यक्ष शंकर सुरवसे, शहराध्यक्ष राजेश भादुले, ब्राह्मण सेल जिल्हाध्यक्ष द. बडवे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष अशपाक सय्यद, माजी शहराध्यक्ष सुहास भाळवणकर, जिल्हा युवक उपाध्यक्ष संदीप शिंदे, कृष्णा कवडे, शहर कार्याध्यक्ष सागर कदम, शहर सरचिटणीस बाळासाहेब आसबे, मिलिंद अढवळकर, देवानंद इरकल, बुवा अधटराव, नागेश अधटराव, बबलू आधटराव, रेहान सय्यद, शिवाजी धोत्रे सर्व काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!