जिल्ह्यात ४० हजार शौषखड्डे होणार
सोलापूर : ईगल आय मीडिया
भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी
वर्षानिमित्त जिल्हयामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत पुढील १०० दिवसांत हागणदारीमुक्त व शाश्वतता टिकविणेसाठी जिल्हयात स्थायित्व व सुजलाम अभियान राबविण्यात येणार आहे. या निमित्ताने सांडपाणी व्यवस्थापन साठी ४० हजार ३७५ शौषखड्डे घेणेत येणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांनी दिली.
लोकसहभागाच्या माध्यमातुन सामुदायिक स्तरावर हागणदरीमुक्त शाश्वततेचे परिणाम अधिक प्रभावीपणे साध्य करणेसाठी आणि ग्रामीण भागात शोषखड्यांच्या निर्मितीतुन सांडपाणी व्यवस्थापन करणे, याबाबींचा समावेश आहे. या कालावधीत जिल्हयात अभियान कालावधीत किमान 40 हजार 375 शोषखड्डे तयार करण्याचे लक्ष निश्चित करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने तालुका निहाय उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
हागणदारीमुक्तीची शाश्वतता टिकविणे आणि सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक इतक्या शोषखड्डयांचे बांधकाम पूर्ण करणे, यासाठी ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करावा. हागणदारीमुक्तीची (ओ.डि.एफ.) शाश्वतता टिकविणे आणि नियोजित शोषखड्डयांच्या बांधकाम करणे यासाठी १०० दिवसांचा आराखडा प्रत्येक ग्रामपंचायत तयार करणार आहे. नादुरुस्त शौचालयांची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे. नादुरुस्त शौचालय अंतर्गत शौचालय दुरुस्त करण्यासाठी कुटुंबांची निवड करण्यासाठी व्दितीयस्तर हागणदारीमुक्ती ग्रामपंचायत पडताळणी पुर्ण करावी तसेच सर्व नवीन कुटुंबांकडे शौचालय असल्याबाबतची खात्री करावी.
अभियानाचे जिल्हास्तरावरून संनियंत्रण करणेसाठी अभियान कालावधी मध्ये जिल्हास्तरावरील जिल्हा कक्ष आणि विविध विभागांचे खाते प्रमुख यांच्या क्षेत्रिय भेटी होणार आहेत. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ मार्गदर्शिके प्रमाणे हागणदरीमुक्त शाश्वतता आणि शोषखडयांचे बांधकाम यासाठी लागणारा निधी स्वच्छ भारत मिशन १५ वा वित्त आयोग किंवा मनरेगा यांच्या माध्यमातुन उपलब्ध केला जाणार आहे. पुर्ण झालेल्या शोषखडयांची ( वैयक्तिकस्तर व सार्वजनिक स्तर ) माहिती स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत उपलब्ध असलेल्या SBM-२.० मोबाईल अॅप्लीकेशन मधुन नोंद करणेत येणार आहे.
जिल्हयात 425 गावात विशेष अभियान – अध्यक्ष अनिरूध्द कांबळे
जिल्हयात १०० दिवसांचे स्थायित्व व सुजलाम अभियान अंतर्गत हागणदारीमुक्त शाश्वतता टिकविणेसाठी ४२५ गावात काम करणेत येणार आहे. नदीकाठच्या गावात प्रथम प्राधान्य असेल असेही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांनी सांगितले.
या बाबत माहिती देताना उप मुकाअ स्मिता पाटील यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीं मध्ये याचा पाठपुरावा करून, १०० दिवसांचे स्थायित्व व सुजलाम अभियान यशस्वी होईल, यादृष्टीने नियोजन करणेत असल्याचे सांगितले. या अभियाना बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशा नुसार तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना सर्व गटविकास आधिकारी यांना देणेत आल्या आहेत असे ही उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगीतले.