पंढरपूर : ईगल आय मीडिया
येथील विविध देव देवतांची दगडी मूर्तीकार आणि भाविकांना विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या मूर्ती कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा सर्व मूर्ती कामगारांना त्वरित आर्थिक मदत करावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी तहसीलदार वैशाली वाघमारे याना निवेदन देण्यात आले. कोरोनाच्या या संकटामुळे समाजातील सर्वच घटक अडचणीत आला आहे. यामध्ये दगडातून देव घडवणारा मूर्ती कामगार देखील सुटला नाही. शहरात शेकडो मूर्ती कामगार असून ते दगडाच्या विविध मूर्ती तयार करतात आणि त्या भाविकांना विकून आपला उदरनिर्वाह करतात.
पण लॉक डाऊनमुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद असल्याने पंढरपूरला एकही भाविक येत नाही. त्यामुळे ,मूर्तीची खरेदी – विक्री बंद झाली आहे. मूर्ती कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे,, बांधकाम कामगारांना ज्या प्रमाणे शासनाने मदत केली, त्याच प्रमाणे या मूर्ती कामगारांना देखील मदत करावी तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने काही मूर्ती विकत घेऊन या मूर्ती कामगारांना मदत करावी अशी मागणी मनसेच्या वतीने प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी केली आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, अर्जुन जाधव,मूर्तिकामगार संघटनेचे शिवाजीराजे धोत्रे,शंकर चौगुले, अंकुश शेळके, दत्तात्रय धोत्रे, राजू चौगुले, सचिन निंबाळकर, मारुती शेळके, अनिल धोत्रे, मारुती चौगुले,सनी धोत्रे,राजू पवार, संजय चौगुले, विठ्ठल शेळके इत्यादी उपस्थीत होते.