पंढरपूर : प्रतिनिधी
रविवारी कंकणाकृती सुर्यग्रहण असल्यामुळे श्री विठ्ठल-रूक्मिणीच्या नित्योपचारात बदल करण्यात आले आहे अशी माहिती मंदिर समिती कडून देण्यात आली.
रविवारी दि. 21 रोजी सकाळी 10 वा. 01 मिनीटांनी ग्रहण स्पर्श प्रारंभ होणार आहे. यामुळे श्री विठ्ठलास स्पर्शाचे स्नान सकाळी 10.01 ते 10.15 पर्यंत घालण्यात येणार आहे. ग्रहणाचा मध्य सकाळी 11 वा. 38 मिनीटाने होणार असून मोश्र (समाप्ती) दुपारी 01 वा. 28 मिनीटांनी होणार आहे. तसेच श्री विठ्ठलास ग्रहण सुटल्याचे स्नान दुपारी 1.28 मी ते 2.00 वाजेपर्यंत होणार आहे. ग्रहणाचा पर्वकाळ हा 03 तास 27 मिनीटे असणार आहे.
तसेच ग्रहणामुळे श्रीं च्या नित्योपचारामध्ये करण्यात आलेला बदल असून दि.20 रोजी रात्रौ शेजारती चे वेळी रोजच्या नैवेद्या ऐवजी श्रीस सुकामेवा, पेढे व दूध याचा नैवेद्य दाखविणे. तसेच दि. 21 रोजी पहाटे काकडा आरती चे वेळी रोजच्या नैवेद्या ऐवजी सुकामेवा पढे व दूध याचा नैवेद्य दाखविणे. दि. 21 रोजी महानेवेद्य सकाळच्या ऐवजी दुपारी दाखविण्यात येणार आहे. दि. 21 रोजी ग्रहण सुटलेनंतरचे स्नान झालेनंतर प्रथम तांदळाची खिचडीचा नैवेद्य दाखविला जाणार आहे. दि. 21 रोजी दु. 05. 00 वाजता महानैवद्यानंतर पोषाख केला जाणार आहे.