ग्रामपंचायतीमध्ये पॅनल आले आणि 20 किलोमीटर दंडवत घालून नवस फेडला

पंढरपूर : ईगल आय मीडिया

सुपली (ता. पंढरपूर) येथील एका ग्रामस्थाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपले पॅनल आल्याच्या आनंदात सुपली ते पंढरपूर पर्यंत दंडवत पूर्ण केला आहे. सुपली ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा सत्तांतर झाले असून येथे हनुमान ग्राम विकास पॅनल विजयी झाले आहे. पॅनल विजयी झाल्यानंतर वामन कुलकर्णी या तरूणाने विठोबाच्या दारा पर्यंत दंडवत घालून आपला पण पूर्ण केला.

सुपली ग्रामपंचायतीवर परिचारक गटाची गेल्या दहा वर्षांपासून सत्ता आहे. ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडून यावे यासाठी वामन कुलकर्णी यांनी पायात चप्पल न घालण्याचा पण केला होता. या निवडणुकीत सत्तांतर झाले तर विठ्ठल मंदिरा पर्यंत दंडवत घालण्याचा संकल्प केला होता.


काल निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. आणि या निवडणुकीत बी वाय अॅग्रो चे बाळासाहेब यलमार यांच्या हनुमान ग्राम विकास पॅनलने ९ च्या ९ जागा जिंकल्या.

यामुळे मागील पाच वर्षापासून विरोधात असलेल्या वामन कुलकर्णी या ग्रामस्थांने विजयाच्या आनंदात सुपली ते पंढरपूर असे २० किलोमीटर अंतर दंडवत घालून पूर्ण केले. संत नामदेव महाराज पायरी जवळ येऊन दर्शन करून हनुमान ग्राम विकास पॅनल कडून हा पण पूर्ण केला. यावेळी नुतन ग्रामपंचायत सदस्य मोहन घोलप, कु. सुवानी यलमर, विठ्ठल चे माजी संचालक बाळासाहेब यलमर, ह.भ.प. मच्छिंद्र कावडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!