स्वेरी आयोजित सीईटीच्या सराव परीक्षांना विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

 दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली सराव सीईटी परीक्षा

पंढरपूर : eagle eye news
 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी या वर्षी दि.१६, एप्रिल ते ०४ मे  या दरम्यान पाच दिवस बारावी विज्ञान शाखेच्या  विद्यार्थ्यांसाठी ‘ऑनलाईन मॉक सीईटी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातुन एमएचटी- सीईटी २०२३ ही परीक्षा देणाऱ्या  विद्यार्थ्यांना सरावासाठी  स्वेरी कॅम्पस मध्ये या पाच मॉक टेस्टस चे आयोजन करण्यात आले होते. या सराव परीक्षांना संपूर्ण जिल्ह्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे.


           महाराष्ट्र स्टेट सीईटी सेलकडून अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण शास्त्र प्रवेशासाठी आवश्यक असणारी ‘एमएचटी– सीईटी २०२३’  ही परीक्षा दि. ९ मे ते दि. २० मे दरम्यान संपूर्ण राज्यभरात घेतली जाणार आहे. या मुख्य परीक्षेचा सराव व्हावा व विद्यार्थ्यांना परीक्षेत अधिक उत्तम गुण मिळावेत या दृष्टीने विठ्ठल  इंजिनिअरींगमध्ये दिवसातील दोन सत्रामध्ये शासनाच्या सीईटी प्रमाणे कॉम्प्यूटर बेस्ड सीईटी या सराव परीक्षांचे तब्बल पाचवेळा आयोजन केले होते. या पाचही सराव परीक्षांना विद्यार्थी व पालकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. स्वेरीने घेतलेल्या या सराव परिक्षांमुळे विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेचा अंदाज आला आहे.

 स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांच्या नेतृत्वाखाली या सराव परीक्षांचे आयोजन केले होते.. या पाचही सराव परीक्षांमध्ये सोलापूरसह लगतच्या जिल्ह्यातून सुमारे दोन हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

 या सराव परीक्षांचे आयोजन केल्याबद्दल विद्यार्थ्यांसह पालकांनी स्वेरीचे विशेष आभार मानले. या सराव परीक्षांसाठी प्रवेश प्रक्रिया विभागातील प्रा.योगेश सुरवसे, प्रा.उत्तम अनुसे, प्रा.अविनाश पारखे, प्रा.पोपट आसबे, प्रा.प्रज्ञा भुसे, प्रा.चेतन जाधव यांच्यासह सर्व विभागांचे विभागप्रमुख व इतर प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. 

Leave a Reply

error: Content is protected !!