थकीत ऊसबिल, विजेचा मुद्यावर स्वाभिमानीचा भर

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी, भाजप तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक मैदानात आहे. या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्न, दोन्हीही साखर कारखानदारांनी थकविलेली ऊस बिले, ऐन उन्हाळ्यात वीज बिलासाठी कट करण्यात आलेली कनेक्शन हे मुद्दे गाजत आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना शेतकऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत असल्याचे दिसते.

स्वाभिमानी चे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रराचारासाठी
राजू शेट्टी हे स्वतः प्रचारासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात तळ ठोकून आहेत. थेट मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यामुळे वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे. ऊस पट्ट्यामध्ये तसेच शहरातही शेट्टी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शेट्टी यांनी सभांमधून शेतकऱ्यांसमोर थकीत ऊसबिल तसेच विजेचे प्रश्न उपस्थित करीत आहेत. मंगळवेढा येथे झालेल्या सभेत राजू शेट्टी हे आक्रमक आणि भावनिकही झाल्याचे पाहायला मिळाले.


राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार यांनी हजेरी लावली आहे. भाजपकडून समाधान आवताडे निवडणूक मैदान आहेत. त्यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह आमदार, खासदार प्रचार करीत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची धुरा स्वतः माजी खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांच्यासह राज्यभरातून आलेल्या स्वाभिमानीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि हातात घेतली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!