थकीत एफआरपीसाठी स्वाभिमानी आक्रमक

कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही, प्रांताधिकारी यांना दिले निवेदन

पंढरपूर : ईगल आय मिडीया
थकीत एफआरपी, कामगारांचे थकीत वेतन दिल्याशिवाय साखर कारखान्यचे धुराडे पेटू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. संघटनेच्या वतीने शुक्रवारी प्रांताधिकारी सचिन ढोले यांना याबाबतचे निवेदन दिले.

व्हीडिओ पहा आणि चॅनेल subscribe करा


गेल्या दोन दिवसात पंढरपूर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे खर्डी, कासेगाव, अनवली भागात नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे करावेत,कांदा निर्यात बंदी तात्काळ हटवावी, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांना निधी उपलब्ध करून द्यावा अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहाजहान शेख, यशवंत बागल, सोमनाथ घोगरे,रायाप्पा हळणवर, नानासाहेब चव्हाण, रणजीत बागल आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!