पंढरपूर : ईगल आय मीडिया
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मार्फत घेण्यात आलेल्या एप्रिल-मे २०२० या परीक्षेत स्वेरी संचलित बी. फार्मसीच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिलेल्या अपूर्वा जवंजाळ, ईश्वरी शिदवाडकर व मोनिका मासाळ ह्या विद्यार्थिनींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने सोलापूर विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील ओसाड माळरानावर १९९८ साली स्वेरीची अर्थात श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर या शिक्षण संकुलाची स्थापना झाली. सन २००६ साली बी.फार्मसीची स्थापना केली. अभियांत्रिकी प्रमाणेच पुढे फार्मसीचा देखील आलेख वाढतच राहिला. गेल्या वर्षी फार्मसीला राष्ट्रीय दर्जाचे एन. बी. ए. मानांकन देखील मिळाले. स्वेरीच्या बी. फार्मसीने देखील सोलापूर जिल्ह्यात अग्रेसर राहण्याचा मान मिळविला.
बी. फार्मसीच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत अपूर्वा संजय जवंजाळ (सीजीपीए -९.५६), ईश्वरी हेमंत शिदवाडकर (सीजीपीए-९.४४) व मोनिका सहदेव मासाळ (सीजीपीए-९.४२) या विद्यार्थिनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आल्या.
त्यांना बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, वर्गशिक्षक प्रा. रामदास नाईकनवरे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. प्रथम आलेल्या तीनही विद्यार्थीनींचे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, कॅम्पस इन्चार्ज, प्राचार्य डॉ. मिथुन मणियार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले.