स्वेरीमध्ये ‘शिक्षक दिन’ साजरा!

‘राष्ट्र उभारणीमध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण’
: कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन

पंढरपूरः ईगल आय मीडिया

मनुष्य सोडून इतर कोणताही प्राणी इतरांना ज्ञान देत नाही. भारतात गुरू-शिष्याची महान परंपरा आहे, जीवनात गुरूला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास व जिद्द निर्माण करणे हेच गुरूंचे कार्य आहे. त्यासाठी शिक्षकांनी आपल्यातील क्षमता जागृत करायला हव्या. शिक्षक हा केवळ एक पेशा नसून ते एक व्रत आहे.’ असे प्रतिपादन नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केले.

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आयोजिलेल्या ‘शिक्षक दिना’च्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलत होते. प्रारंभी प्रवेशद्वाराजवळ भारतरत्न डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन माजी विद्यार्थी संदीप अवघडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, ज्येष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त एच.एम. बागल, विश्वस्त विजय शेलार, युवा विश्वस्त सुरज रोंगे, डॉ.स्नेहा रोंगे, इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

या ऑनलाईन मार्गदर्शन सत्रामध्ये प्रा. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन केले तर संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा.सी.बी. नाडगौडा यांनी आभार मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!