गोपाळपूर : स्वेरीमध्ये ७४ वा स्वातंत्र्य दिन साजरा

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात भारताचा ७४ वा स्वातंत्र्य दिन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग पाळून साजरा करण्यात आला.
डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतमातेच्या प्रतिमा पूजनानंतर प्राचार्य डॉ. मिसाळ यांनी अर्थ कारण, समाजकारण, क्रीडा, शिक्षण व्यवस्था यावर प्रकाश टाकून भविष्यातील भारत कसा असेल आणि त्यात अभियंता म्हणुन आपली भूमिका काय असावी? हे विशद केले. ‘
यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.अमित गंगवाल, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, प्रशासन अधिष्ठाता प्रा. सचिन गवळी, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.अभय उत्पात, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.करण पाटील, सर्व विभागप्रमुख, बालाजी सुरवसे, इलेक्ट्रिकल सुपर वायझर संतोष जाधव तसेच निवडक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. सचिन भोसले यांनी फेसबुकद्वारे थेट प्रक्षेपण व गुगल मीट ऍप्पद्वारे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण कार्यक्रम पाहण्याची सोय केली होती. त्यामुळे स्वेरी अंतर्गत असलेल्या चारही महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुगल मीट व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ध्वजारोहणावेळी ऑनलाईन उपस्थित होते. प्रा.यशपाल खेडकर यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून आभार मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!