स्वेरीचे तंत्रशिक्षण क्षेत्रात अलौकिक कार्य :
कुलगुरू प्रा. डॉ. मिश्रा
पंढरपूर : ईगल आय मीडिया
‘मी सोलापूर विद्यापीठात चार्ज घेतल्यापासून पाहतोय की स्वेरी पंढरपूर सारख्या ग्रामीण भागात तंत्रशिक्षण क्षेत्रात अलौकिक कार्य करत आहे. पुर्वीपासूनच मला स्वेरीची आणि डॉ.रोंगे सरांच्या टीमच्या कार्याची ओळख होती. शैक्षणिक क्षेत्रात आपल्या नव्या पद्धतीने शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना विकासाकडे नेणाऱ्या या स्वेरीचे नाव आज राज्यात आदराने घेतले जात आहे असे, गौरवोद्गार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र.कुलगुरू प्रा. डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनी केले.
श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरच्या तेवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त ‘फेसबुक लाईव्ह’ आणि ‘गुगल मीट अॅप’च्या माध्यमातून आयोजित केलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्र. कुलगुरु डॉ. मिश्रा स्वेरी परिवार व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.
प्रास्तविकात प्रा. यशपाल खेडकर यांनी प्र. कुलगुरु डॉ. मिश्रा यांच्या कार्याची ओळख करून देत स्वेरीच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा लेखाजोखा सादर केला.
पुढे बोलताना प्र. कुलगुरु डॉ. मिश्रा म्हणाले की, ‘डॉ. रोंगे यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रातील नव्या पद्धतीमुळे मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली आहे. येथील वातावरण, संस्कृती, शिस्त इ. मुळे विद्यार्थी विशेष परिश्रम घेवून शिक्षण घेत आहेत याचाही सार्थ अभिमान वाटतो.’
स्वेरीच्या या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सकाळच्या सत्रात स्वेरी कॅम्पसमध्ये वड, पिंपळ, चिंच, करंजे अशी विविध प्रकारची २३ रोपे स्वेरीच्या पदाधिकाऱ्यांनी व पाहुण्यांनी लावली. ही सर्व रोपे पंढरपुरच्या सामाजिक कार्यकर्त्या व फार्मासिस्ट सौ. वर्षा चंकेश्वरा यांनी देऊ केली होती.
संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी, आभार प्रदर्शनात स्वेरीच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या वाटचालीतील संघर्ष आणि त्यातून मिळालेले यश याविषयी सविस्तर माहिती दिली. आणि ‘मनापासून प्रामाणिक प्रयत्न केल्यास नशीब देखील साथ देते आणि आमच्या प्रत्येक वाटचालीस यश मिळत गेले.’ असे प्रतिपादन केले.
वृक्षारोपणाचे समन्वयक म्हणून प्रा. के. एस. पुकाळे यांनी काम पहिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, संस्थेचे माजी अध्यक्ष व जेष्ठ विश्वस्त प्रा. सी.बी. नाडगौडा, माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, संस्थेचे जेष्ठ संस्थापक विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे, युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, डॉ. स्नेहा जाधव–रोंगे, निवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी शहाजी जाधव, पालक संघाचे आबासाहेब दैठणकर, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.