स्वेरीचा सेंटीलायन नेटवर्क सोबत सामंजस्य करार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गोपाळपूर ( ता. पंढरपूर ) येथील श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचा हैद्राबाद येथील सेंटीलायन नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड सोबत नुकताच सामंजस्य करार झाल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

या सामंजस्य करारावर सेंटीलायन नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड तर्फे कंपनीचे कार्यकारी अधिकारी व्यंकट चुंडी व महाविद्यालयातर्फे स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. सेंटीलायन नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड बरोबर झालेल्या सामंजस्य करारामुळे स्वेरीमधील संशोधक व प्राध्यापक यांना नवीन क्षेत्रामध्ये त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे.

सेंटीलायन नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड सोबत स्वेरीमधील प्राध्यापक व संशोधक यांची तांत्रिक बाबीं संदर्भात देवाण -घेवाण होणार आहे. तसेच या करारानुसार संस्थेमध्ये एरोस्टॅट बलून्स या संदर्भात संशोधन होणार आहे. या कराराद्वारे स्वेरी त्यांच्या प्राध्यापक, संशोधकाद्वारे एरोस्टॅट बलून्सची कार्यक्षमता सुधारणे, कमतरता दूर करणे, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित प्रभावी आणि उत्कृष्ट डिझाईनच्या माध्यमातून कार्यक्षम एरोस्टॅट बलून्स तयार करण्यामध्ये मदत होणार आहे.
पूर्वी स्वेरीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर ३० कंपन्यांबरोबर सामंजस्य करार स्थापित झालेले आहेत.

हा करार पूर्ण होण्यासाठी डॉ. श्रीदेवी तसेच शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, संशोधन अधिष्ठाता डॉ. संतोष साळुंखे व डॉ. रणजीत गिड्डे यांनी परिश्रम घेतले.

या करारामुळे संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पसचे इनचार्ज प्रा. एम. एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

error: Content is protected !!