कु. शुभांगी कनकी प्रथम,
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गोपाळपूर येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा फार्मसी कॉलेजचा प्रथम वर्षाचा निकाल नुकताच लागलेला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एम.एस.बी.टी.ई.) ने जाहीर केलेल्या निकालात स्वेरी संचलित डी. फार्मसीचा निकाल शंभर टक्के लागला असून शुभांगी कनकी यांनी महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
पंढरपूर परिसरातील विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय पाहून डॉ. बी. पी. रोंगे यांनी पंढरपूर पंचक्रोशीतील नागरिकांच्या फार्मसीकरीता असणाऱ्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर १५ वर्षापुर्वीच डी.फार्मसी कॉलेजची स्थापना केली. विद्यार्थ्यांनी देखील यशाची परंपरा कायम राखल्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रथम वर्ष डिप्लोमा फार्मसी परीक्षेमध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक शुभांगी अमरनाथ कनकी (९४.८३ टक्के), द्वितीय क्रमांक प्रतीक्षा शिवाजी क्षीरसागर (९३.७३टक्के), तृतीय क्रमांक विश्वजित लक्ष्मण कदम (९३.५५ टक्के) यांनी मिळविले तर अकरा विद्यार्थ्यांनी ९० टक्क्याहून अधिक गुण मिळविले. यशस्वी विद्यार्थ्याना प्राचार्य प्रा. सतिश मांडवे यांच्यासह प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक-सचिव डॉ.बी.पी.रोंगे,संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.
स्वेरी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन