रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.अशोक भोईटे यांचे गौरवोद्गार
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गोपाळपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात स्वेरी म्हणजे एका किमयागाराने केलेली किमयाच आहे. स्वेरीला सावळ्या विठ्ठलाचा आशीर्वाद लाभलेला आहे. अवघड असलेले काम सोपे करणे, सोपे असलेले काम सहज करणे, सहज असलेले काम सुंदर करणे आणि सुंदर असलेले कार्य जतन करणे याप्रमाणे डॉ. रोंगे सर कार्य करत आहेत.’ असे प्रतिपादन पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयाचे सेवा निवृत्त प्राचार्य डॉ.अशोक भुईटे यांनी केले.
प्रा. डॉ. भुईटे यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने स्वेरीचे संस्थापक सचिव आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या हस्ते डॉ.भुईटे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक करताना डॉ.बी.पी. रोंगे म्हणाले की, ‘डॉ.भुईटे यांच्या उच्च कार्याची दखल घेऊनच त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. पंढरपूरचे प्राचार्य म्हणून यशस्वीपणे कार्यभार पाहिला व अलीकडेच ते सेवानिवृत्त झाले.’ याप्रसंगी प्राचार्य डॉ. भुईटे यांनी, मी स्वेरी बद्दल फार पूर्वीपासून ऐकत आलोय. माझ्याकडे आलेल्या अनेक पालकांनी स्वेरीच्या कार्याचे मनापासून कौतुक केलेले आहे.
यावेळी माजी विद्यार्थी निखिल बागल, स्वेरी अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता आणि प्राध्यापक वर्ग या समारंभात उपस्थित होते.
प्रा.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.