स्वेरीमध्ये शिक्षणाबरोबर उत्तम संस्कारही मिळतात


मर्चंट नेव्ही अभियंता विश्वनाथ गायकवाड

पंढरपूर ; ईगल आय मीडिया

‘माणसाच्या आयुष्यात ‘शिक्षण’ हा खूप महत्त्वाचा भाग असून शिक्षणामुळे आपले भवितव्य उज्वल होते. माझ्यावर देखील स्वेरीतच संस्कार झाले. डॉ. रोंगे सरांच्या सिस्टम मधून मी तयार झालो असून आज मला शिक्षणाचे किती महत्व आहे हे समजत आहे. रोज याच फाईव्ह सेन्टेन्सेसनी माझ्या जीवनाचा अर्थ बदलवला. त्यामुळे मी डॉ. रोंगे सरांना गुरु मानतो. एकूणच स्वेरीत मिळणाऱ्या शिक्षणामुळे जग बदलू शकते याचे कारण म्हणजे स्वेरीत शिक्षणाबरोबरच संस्कार देखील मिळतात आणि या सर्व गोष्टींचा आज मला फायदा झाला आहे.’ असे प्रतिपादन भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये अभियंता असलेले विश्वनाथ गायकवाड यांनी केले.
स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून २०१० साली पदवी संपादन केल्यानंतर विश्वनाथ गायकवाड यांची स्वेरीतील कॅम्पस प्लेसमेंट मधून मर्चंट नेव्हीमध्ये भारतीय व्यापारी नौदल अधिकारी सेकंड इंजिनिअर म्हणून निवड झाली. सीबल्क ट्रॅडिशनच्या व्यापारी जहाजावर कार्यरत असलेले विश्वनाथ गायकवाड आज जहाजावरून ब्राझील मधील पोर्ट परानागोवा येथून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन करत होते.

यावेळी जहाजावरील दुसरे सहकारी अभियंता प्रशांत यादव यांनी जहाजेचे कार्य कसे चालते याची माहिती दिली.

One thought on “स्वेरीमध्ये शिक्षणाबरोबर उत्तम संस्कारही मिळतात

  1. स्वेरीमुळे ग्रामीण भागातील मुलांना तंत्रशिक्षणात गोडी निर्माण झाली.

Leave a Reply

error: Content is protected !!