स्वेरीमध्ये माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली


पंढरपूर : ईगल आय मीडिया

‘एक सामान्य कार्यकर्ते म्हणून राजकारणात सुरुवात केलेले प्रणव मुखर्जी पुढे भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होतात. सर्वांशी सहमत राहून उदात्त कार्य करण्याचे त्यांचे कसब होते. भारताच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, क्रीडा, कला आदी सर्व क्षेत्रात मौलिक विचार देणारे क्रांतिकारी नेतृत्व मुखर्जी यांच्या रूपाने भारताने गमावले आहे.’ असे प्रतिपादन श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी केले
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न कै. प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे स्वेरीमध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पुढे डॉ. रोंगे म्हणाले की, ‘मुखर्जी यांचे पंतप्रधानपद जरी हुकले असले तरी देशाचे नेतृत्व त्यांनी सर्वोत्तमपणे सांभाळले आहे. घटनेतील सर्वोच्च पद त्यांनी त्यांच्या कष्टाने, परिश्रमाने मिळवले. राजकारणामध्ये सुरवातीपासून असले तरी त्यांनी परिश्रमाने स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अकाली जाण्याने देशाच्या नेतृत्वामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी केलेले कार्य व योगदान भारतीयांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील.’ असे सांगून डॉ. रोंगे यांनी त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या काळातील कार्यावर विशेष प्रकाश टाकला.

यावेळी स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, स्वेरी संचलित इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!