पंढरपूर : प्रतिनिधी
पंढरपूर येथील श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते प्रशालेतील कलाध्यापक श्रीकांत विनायक चंदनशिवे यांना महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती यांचे तर्फे दिला जाणारा कृतिशील कलाशिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
कलाशिक्षक चंदनशिवे सर यांनी केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल माननीय आमदार दत्तात्रय सावंत सर व इतर मान्यवर यांचे शुभहस्ते सदरचा पुरस्कार देऊन त्यांना रविवार दि. 1 डिसेंबर 2024 रोजी सिंहगड कॉलेज कोर्टी, पंढरपूर येथे सन्मानित करण्यात येणार आहे. प्राचार्य प्रा.सुधाकर पिसे, पर्यवेक्षक रणजीत शिनगारे व ज्येष्ठ लिपीक राजकुमार ढगे यांच्या हस्ते व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे उपस्थितीत पुरस्कार निवडीचे पत्र त्यांना सुपूर्द करण्यात आले.
आपल्या प्रशालेतील शिक्षकाला मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कार्याला शाबासकी व प्रशालेसाठीही नक्कीच गौरवास्पद असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी तो महत्त्वाचा असल्याचे प्राचार्य पिसे यांनी सांगितले.
त्यांच्या या यशाबद्दल खा.प्रणिती शिंदे,आ.प्रशांत परिचारक,आ.समाधान आवताडे,आ.राजू खरे,भगिरथ भालके,संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर, उपाध्यक्ष शिवाजी वाघ,सचिव वैभव टोमके,सहसचिव अजित नडगिरे,खजिनदार सलीम वडगावकर, ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब चोपडे, दिलीप घाडगे, अनिरुद्ध सालविठ्ठल, विजयकुमार माळवदकर, सुनीता मोरे, प्राचार्य प्रा. सुधाकर पिसे, रणजीत शिनगारे, जैनुद्दीन शेख, पत्रकार सिद्धार्थ ढवळे,शिवाजी शिंदे, अंबादास वायदंडे,साधना उगले,सुनील सर्वगोड, राजू सर्वगोड, नगरसेवक संजय निंबाळकर,वामन बंदपट्टे,अमोल डोके, सुधीर धोत्रे, कृष्णा वाघमारे यांसह शैक्षणिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले व आणि त्यांच्या पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.