पंढरपूर : eagle eye news
वेंगुर्ला (जि सिंधुदुर्ग )येथे होणाऱ्या शिक्षक समितीच्या पंधराव्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी पंढरपूर तालुक्यातून 700 शिक्षक जाणार असल्याची माहिती शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सुनील कोरे यांनी दिली आहे.
या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, बंदरे आणि खनीकर्म मंत्री मंत्री दादा भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत हे उपस्थित राहणार आहेत.
सदर अधिवेशनात विविध शैक्षणिक व शिक्षकांच्या प्रश्नावर ती चर्चा होणार आहे तरी तालुक्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष सुनील कोरे, सरचिटणीस पोपट कापसे, जिल्हा कोषाध्यक्ष रमेश खारे, जिल्हा उपाध्यक्ष डाॕ.सचिन लादे व सौ सुरेखा इंगळे यांनी केले आहे.