तुंगत येथे पंतांच्या अस्थी दर्शनासाठी लोटला जनसागर

सामाजिक अंतर राखून घेतले दर्शन

पंढरपूर : ईगल आय मीडिया

माजी आमदार व पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख सुधाकरपंत परिचारक यांचे निधन झाल्याची बातमी कळताच तुंगत परिसरात सर्वत्र दुःखाची लहर पसरली. ऐन बैल पोळ्याचा सण असतानाही शेतकऱ्यांचा खरा पांडुरंग आपल्यातून गेल्याने बैलपोळ्याच्या सणावर उदासीनता दिसून आली.
बुधवारी सकाळी ७.३० वाजता कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या अस्थिकलशाचे तुंगत येथे आगमन होताच दर्शनासाठी येथील मोठ्या संख्येने जनसागर लोटला होता. गर्दी होवु नये म्हणुन शारीरिक अंतर ठेवून उभी राहिले. प्रथम पसायदान झाले , त्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली व शारीरिक अंतर ठेवून रांगेने व शिस्तीत अस्थिकलशाचे दर्शन घेण्यात आले.
सकाळची वेळ असल्याने गावातील आबालवृद्धांनी परिचारक यांचे अंत्यदर्शन झाले नसले तरी, अस्थी दर्शन मिळाल्याचे समाधान व्यक्त होत आहे. विठ्ठल चे संचालक महादेव देठे व संजय रणदिवे यांनी मा.आ. सुधाकरपंत परिचारक यांच्या आठवणी व त्यांच्या कार्याचा उजाळा देऊन श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी सरपंच आगतराव रणदिवे , विठ्ठल चे संचालक महादेव देठे ,खंडेराव रणदिवे ,प्रभाकर भोसले ,अरुण रणदिवे ,मा. चेअरमन दत्तू आंद ,तानाजी रणदिवे,संजय रणदिवे,विठ्ठल रणदिवे, सोसायटीचे चेअरमन महेंद्र रणदिवे, उपसरपंच पंकज लामकाने ,अमित साळुंखे , बाजीराव गायकवाड , इंद्रजीत रणदिवे, कृष्णदेव भोसले ,महादेव रणदिवे, गणपत रणदिवे ,पांडुरंग बागल ,राजू भोसले. ग्रामपंचायतीचे सदस्य ,सोसायटीचे संचालक व विविध संस्थांचे पदाधिकारी तरुणवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!