उजणी पाण्या संदर्भातील निर्णय रद्द !

पंढरीत पेढे वाटून व अभिषेक करून केला जल्लोष


पंढरपूूूर : ईगल आय मीडिया

उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी 5 टीएमसी पाणी नेण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने रद्द केल्यानंतर आज पंढरपूर मध्ये साखर वाटून आनंद व्यक्त केला, आणि चंद्रभागेच्या पाण्याने विठ्ठल रखुमाईस अभिषेक घालण्यात आला.

सोलापूर जिल्ह्यातील हक्काचं पाणी इंदापूरला पळविण्याचा घाट पालकमंत्री दत्तामामा भरणे घालत 5 टीएमसी पाणी पळवले होते. परंतु पाणी संघर्ष समिती ने संपूर्ण जिल्हाभर रान पेटवले व उजनी धरणामध्ये जलसमाधी आंदोलन केले. लोकप्रतिनिधींच्या घरासमोर हलगी नाद आंदोलन केले, शेतकर्‍यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.


उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने आज विठ्ठलाला अभिषेक करण्यात आला. गेल्या 15 दिवसा पासून सोलापूर जिल्ह्यात उजनी चा पाणी प्रश्न पेटलेला होता. उजनी पाणी संघर्ष समितीच्या वतीने चंद्रभागेच्या पवित्र पाणी कावड करून आणून नामदेव पायरी जवळ विठ्ठलाचा अभिषेक केला.

यावेळी माऊली हळणवर, दीपक वाडदेकर, बापूसाहेब मेटकरी, धनाजीराव गडदे, रुक्मिणी दोलतडे, आप्पासाहेब मेटकरी यांच्यासह उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!