विठ्ठल बचाव संघर्ष समितीचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
पंढरपूर : ईगल आय मीडिया
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणुनगर, गुरसाळे (ता. पंढरपूर) या कारखान्याशी संबंधितांना न्याय मिळण्यासाठी येथील प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना विठ्ठल बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.बी. पी. रोंगे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना निवेदन दिले.
गळीत हंगाम २०१८-२०१९ मधील गळित केलेल्या ऊसापोटी शेतकऱ्यांची एफआरपीची थकित रक्कम त्वरित द्यावी, कामगारांचा थकित पगार त्वरित देण्यात यावा, गळीत हंगाम २०२०-२०२१ मध्ये साखर कारखाना सुरू करावा, ज्या कामगारांना कामावरून कमी केलेले आहे त्यांना त्वरित कामावर घेण्यात यावे, वाहतुकदारांची वाहतुक बीले व कमिशन पोटीची थकीत रक्कम ताबडतोब द्यावी, श्री विठठ्ल सर्व सेवा संघातर्फे उचल म्हणून दिलेली व थकीत असलेली सर्व रक्कम वसूल करावी या मागण्या केल्या आहेत. तसेच या निवेदनाच्या अनुषंगाने कारखान्याच्या संचालक मंडळासह प्रशासनास कार्यवाही करण्याच्या दृष्टीने आदेश करण्यात यावेत अशीही मागणी केली आहे.
या निवेदनावर श्री. विठ्ठल बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.बी. पी. रोंगे, शेखर भोसले, बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर, पांडुरंग नाईकनवरे, दीपक भोसले, पांडुरंग देशमुख यांच्या सह्या आहेत. निवेदन देताना नारायण मेटकरी, डॉ. धर्तीराज शिंदे, सुभाष होळकर, अंकुश शेंबडे, दिलीप भोसले, शिवाजी रणदिवे यांच्यासह उत्तम बाबा चव्हाण, माऊली भोसले, सचिन अटकळे, बापू नवले व इतर उपस्थित होते.