ओढ्याकाठची गावे होणार दुष्काळमुक्त, जलसंपदामंञ्यांचा लेखी आदेश
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपुर तालुक्यातील गार्डी, पळशी, सुपली, उपरी, भंडीशेगाव, शेळवे, वाडीकुरोली या सर्व गागावातून वाहणाऱ्या कासाळ ओढयास दर्जा मिळावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अरुण आसबे यांनी केली. तात्काळ जलसंपदामंञी जयंत पाटील यांनी मागणी मंजूर करुन त्याबाबतचे लेखी आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.
या कासाळ ओढयामुळे पंढरपूर तालुक्यातील बहुतांश गावे बागायती झाली आहेत. या ओढयामध्ये लोकसहभाग व टाटा ट्रस्टच्या माध्यमातून जलयुक्त शिवारचे कोटयावधी रुपयांचे काम झाले आहे. ओढया शेजारूनच उजनी उजवा कालवा वाहतो.
पंढरपूर तालुक्यातील उजनी व भाटघर व कॅॅॅॅनाॅललगत असलेल्या इतरही गावामधील ओढे व नाल्यांना कॅनाॅलचा दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही पाठपुरवठा करणार आहोत.
– अरुण आसबे
प्रदेश सचिव, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
त्यामुळे दरवर्षी उन्हाळयात उजणी कॅनाॅलचे पाणी सोडताना शेतक-यांना अडचणी येतात. ग्रामस्थ रस्त्यावर उतरुन आंदोलन करतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न मिटविण्यासाठी राष्ट्रवादी युवक काॅग्रेसने जलसंपदामंञ्यांना याबाबत निवेदन दिले.