एक पद, एक झाड संकल्पनेचा शुभारंभ

वट पौर्णिमे निमित्त जिल्हा परिषद आवारात वृक्षारोपण

सोलापूर : ईगल आय मीडिया
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या ‘ एक पद एक झाड ‘ या संकल्पनेनुसार आज वट पौर्णिमेनिमित्त जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षच्यावतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) गोरख शेलार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या पार्किंगच्या परिसरामध्ये आज वृक्षारोपण करण्यात आले. तसेच वट पौर्णिमेनिमित्त जिल्हा कक्षमधील महिला कर्मचारी यांना रोप भेट देण्यात आले. यावेळी कर्मचारी यांनी रोप जतन करण्याची जबाबदारी स्वीकारली.

याप्रसंगी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, पाणी गुणवत्ता निरीक्षक डॉ.ए.सी.मुजावर , मनुष्यबळ सल्लागार शंकर बंडगर , संवाद सल्लागार सचिन सोनवणे , समाजशास्त्रज्ञ महादेव शिंदे , स्वच्छता तज्ञ प्रशांत दबडे , सनियंत्रण व मुल्यमापन तज्ञ यशवंती धत्तुरे , वित्त नि संपादणूक तज्ञ अर्चना कणकी , पाणी गुणवत्ता सल्लागार दिपाली व्हटे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!