उद्योग पंढरीचे वारकरी, युवकांचे आयकॉन : अभिजित पाटील

वाढदिवस अभिष्टचिंतन

पंढरीला सामाजिक , सांस्कृतिक, अध्यात्मिक, सहकार ,समृद्ध अर्थकारणाची, मोठी परंपरा आहे. राज्याची अध्यात्मिक राजधानी, दक्षिण भारताची काशी असलेली पंढरी अनेक अर्थानी नेहमीच राज्यभरात, देशभरात नेहमीच उल्लेखित आहे. पंढरीचा विठोबा, येथील सहकार, साखर कारखानदारी, सक्षम बँकिंग, व्यापार राज्यासाठी भूषणावह ठरलेला आहे. ज्या-त्या काळातील पिढ्यानी, त्या त्या वेळच्या धुरिणांनी पंढरीचा महिमा वाढवण्यात खारीचा वाटा उचलला आहे. याच कर्तबगार परंपरेत, वारसा शृंखलेची कडी ठरले आहेत युवा उद्योजक अभिजित पाटील. युवक वर्गात ‘ आबा ” म्हणून परिचित असलेले अभिजित पाटील नव्या पिढीतील, नव्या युगातील पंढरीचा उद्यमशील, सृजनशील चेहरा बनलेले आहेत. अल्पावधीत त्यांनी उभा केलेलं डीव्हीपी उद्योग समूहाचे जाळे खान्देशापासून मराठवाड्यापर्यंत विस्तारत आहे. १ लाख हातांना रोजगार देण्याचं त्यांचं स्वप्न वेगाने आकारास येत असल्याचं दिसत आहे.

देगाव सारख्या छोट्याश्या गावातील नामांकित वकील धनंजय पाटील यांचे सुपुत्र म्हणून वाढलेले अभिजित पाटील यांनी पंढरीत उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवले. साखर कारखान्यास ऊस वाहतूक करण्यासाठी टोळी करण्यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास पुढे ट्रॅक्टरची डिलरशिप घेऊन सोनालिका कंपनीचे देशभरातील आघाडीचे वितरक होण्यापर्यंत पोहोचला. समृध्दी ट्रॅक्टर्स हे नाव जागतिक पातळीवरील सोनालिका ब्रॅण्डच्या दफतरी वरच्या क्रमांकवर आहे. त्यानंतर हॉटेल विठ्ठल कामत ,डि.व्ही.पी.मार्ट ,डि.व्ही.पी.स्क्वेअर,डिव्हीपी नागरी सहकारी पतसंस्था, धाराशीव साखर कारखान्याच्या उस्मानाबाद, नांदेड, नाशिक युनिटच्या उभारणीपर्यंत अभिजीत पाटील यांची घोडदौड सुरु आहे. डीव्हीपी उद्योगसमूह आणि याचे सर्वेसर्वा अभिजित पाटील व अमर पाटील हे बंधू अल्पावधीत आपल्या केवळ कर्तृत्वाच्या बळावर युवकांचे प्रेरणास्थान बनले आहेत.
गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत डीव्हीपी उद्योग समूहाने मोठी विश्वासाहर्ता प्राप्त केली त्याच बरोबर या शहर तालुक्यातील अनेक युवकांना प्रत्यक्ष,अप्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.उस्मानाबाद,नांदेड आणि नाशिक जिल्ह्यातील डीव्हीपी उद्योगाच्या माध्यमातून घेऊन अवसानयात निघालेल्या या कारखान्यांना संजीवनी दिली. डीव्हीपी गारमेंट्स, डीव्हीपी मॉल,डीव्हीपी इन्फ्रास्ट्रुक्चरच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. यशाची हवा डोक्यात जाऊ न देता कायम पाय जमिनीवर ठेऊन चालणाऱ्या अभिजीत पाटील यांनी माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबत सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून मुंबई,पुणे,ठाणे यासह विविध जिल्हयात उद्योग, व्यवसाय,रोजगार यासाठी स्थलांतरीत सोलापूर जिल्ह्यातील तरुणाईशी जे नाते जोडले आहे.


शेतकर्‍यांच्या पोरांनी आता निव्वळ शेती, साचेबद्ध शिक्षण याच्या बाहेर पडून नव्या वाटा शोधाव्यात असे बोलले जाऊ लागले आहे आणि अशावेळी अभिजीत पाटील यांचे उदाहरण सर्वांच्या नजरेसमोर असते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन युवक विविध उद्योगव्यवसायात पुढे यावे अशी भावना मनात ठेऊन वाटचाल करताना दिसतात, अशा युवकांचे अभिजित पाटील हे आयकॉन ठरले आहेत.
अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली डि.व्ही.पी.उद्योग समुहाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. अनेक कठीण प्रसंगाच्या समयी,अनेक प्रेरक उपक्रमांसाठी,अनेक ठिकाणी मदतीसाठी तर नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या मदतीसाठी,दिलासा देण्यासाठी सदैव पुढे राहीला आहे. उद्योजक अभिजित पाटील आणि त्यांचे बंधू अमर पाटील यांच्या सामाजिक जाणिवेतून डीव्हीपी उद्योग समूह वाटचाल करीत आहे.
याच युथ आयकॉन अभिजित { आबा } पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो, त्यांच्या नेतृत्वाखाली डीव्हीपीचा वेल गगन मंडपाला जावो याच सदिच्छा !

Leave a Reply

error: Content is protected !!