नागरी सेवा परीक्षेच्या रॅम्पवरही ऐश्वर्या शोराणचा जलवा
टीम : ईगल आय मीडिया
फेमिना मिस इंडिया सारख्या देशातील सर्वात मोठ्या सौन्दर्य स्पर्धेत अंतिम फेरीत दाखल झालेली आणि अनेक सौन्दर्य स्पर्धा जिंकलेली प्रसिद्ध सौन्दर्य तारका, मॉडेल ऐश्वर्या शोराण हिने आपण ” ब्युटी विथ ब्रेन ” असल्याचे सिद्ध केले आहे. अवघ्या 23 व्या वर्षी भारतीय नागरी सेवेत तिने चक्क 93 वी रँक मिळवली असून तीसुद्धा पहिल्याच प्रयत्नात आणि कोणतीही शिकवणी न लावता. याबद्दल ऐश्वर्याचे सर्वत्र कौतुक होतंय हे सांगायला नको, तिच्या फॅन्सनी पण तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
नागरी सेवा परीक्षा २०१९ चा निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) जाहीर करण्यात आला झाला आहे. या परिक्षेत प्रसिद्ध मॉडेल ऐश्वर्या श्योराण हिने बाजी मारली आहे. फेमिना मिस इंडिया स्पर्धेत फाइनलिस्ट ठरलेल्या ऐश्वर्याने UPSC परिक्षेत चक्क ९१ वा क्रमांक पटकावला आहे.
ऐश्वर्या शोराण हीचा जन्म आणि शिक्षण दिल्लीत झाले. महाविद्यालयीन शिक्षणात तिने अशीच चुणूक दाखवली आहे. दिल्लीतील संस्कृती स्कुलमधून फिजिक्स, केमिस्ट्री, गणित आणि अर्थशास्त्र या विषयात 97.5 टक्के गुण मिळवले होते. तिचे वडील अजयकुमार शोराण हे कारीमनगर येथे तेलंगणा बटालियनचे एन. सी. सी. कमांडींग ऑफिसर आहेत. तिची आई गृहिणी असून भाऊ अमन 23 वर्षाखालील मुंबई क्रिकेट संघात खेळत आहे.
फेमिना मिस इंडिया २०१६ च्या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचलेली, दिल्ली कँपस प्रिंसेस दिल्ली, फ्रेशफेस विजेता अशा सौन्दर्य स्पर्धा जिंकणाऱ्या ऐश्वर्या श्योराण हिने UPSC परिक्षेत ९3 वा क्रमांक पटकावला आहे. UPSC परिक्षेत यश मिळवणं सोप नसतं. परंतु ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे. आणि तेसुद्धा स्पर्धा परीक्षेचे कोणतेही क्लास न लावता हे यश मिळवले आहे. यावरून तिचे टॅलेंट दिसून येते.
सौन्दर्य स्पर्धा, त्यात सहभागी होणाऱ्या मॉडेल्स यांच्याकडे एका विशिष्ट नजरेने पाहणाऱ्या लोकांना ऐश्वर्याचे हे यश ” त्या ” मुली ब्युटी तर असतातच मात्र त्यांच्याकडे जन्मजात प्रतिभा सुद्धा असते हे दाखवून देणारे आहे.
अप्रतिम अंजन घालणारे यश, अभिनंदन ऐश्वर्या….