स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे करणार मार्गदर्शन
पंढरपूर : ईगल आय मीडिया
येथील स्वेरी संस्थेतर्फे 12 वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी येत्या गुरुवारी ( दि. २२ ऑक्टोबर ) रोजी सायंकाळी ६.३० वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे.स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे सर यावेळी मार्गदर्शन करणार आहेत ’ अशी माहिती प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. धनंजय चौधरी यांनी दिली.
कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच प्रवेश प्रक्रियांना विलंब झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सध्या एमएचटी- सीईटी परीक्षा सुरु आहेत. येत्या काही दिवसात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (कॅप) सुरु होण्याची शक्यता आहे. याकरिता बारावी सायन्स शाखेमधून उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पुढील भवितव्याचा विचार करून या महत्वपूर्ण मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हे मार्गदर्शन सत्र गुरुवार, दि. २२ आक्टोंबर २०२० रोजी सायंकाळी ६.३० वाजता फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून www.facebook.com/svericampus/live/ या लिंकवरून होणार आहे. प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सर यांचे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (कॅप राऊंडस), विविध शाखांची निवड, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे आदी बाबत सविस्तर चर्चा/मार्गदर्शन व्हावे या दृष्टीने खास विद्यार्थी व पालकांसाठी या विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी या मार्गदर्शन सत्राचा विद्यार्थी व पालकांनी अवश्य लाभ घ्यावा.’ असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. उत्तम अनुसे (९१६८६५५३६५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे देखील आवाहन केले आहे.