फोटो ; योगिता पोरे
पंढरपूर : eagle eye news
येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी कु. योगिता ज्ञानेश्वर पोरे हिने इयत्ता १२ वीच्या परीक्षेत अकौंटन्सी या विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवले आहेत. त्याच बरोबर सहकार ( ९२ )आणि वाणिज्य व्यवस्थापन ( ९२ ) या विषयांतही योगिताने प्रत्येकी ९२ टक्के गुण मिळवले आहेत. या परीक्षेत योगिताने एकूण ८५. ८३ टक्के गुण मिळवले आहेत.
नुकताच इयत्ता १२ वी च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेत शिकत असलेल्या योगिता पोरे या विद्यार्थिनीने धवल यश प्राप्त केले असून या यशाबद्दल योगिताचे अभिनंदन होत आहे.
वाणिज्य क्षेत्रातच करियर करायचे असल्याचे यावेळी योगिता ने सांगितले. येथील मर्चंट्स को. ऑप. बँकेचे अधिकारी ज्ञानेश्वर पोरे यांची योगिता हि कन्या आहे. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी योगिताचे अभिनंदन केले आहे.