माढ्यात विवाहित युवतीचा खून

माढा पोलिसांत पती, सासू,सासरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल 

माढा : ईगल आय मीडिया

उस्मानाबाद येथील प्लाॅट नावावर करुन देण्याच्या मागणी करीत, चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा गळा दाबून खून केल्याची घटना माढा शहरात घडली आहे. याप्रकरणी माढा पोलिसात नवरा व सासू, सासरा अशा तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी पेठेत शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
सना इरफान मोमीन (वय २७) असे मयत महिलेचे नाव असून इरफान रजाक मोमीन, रजाक मकबूल मोमीन,आसिया रजाक मोमीन अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

याप्रकरणी मयताचे वडील महंमदमुसा गुलामदस्तगीर अन्सारी (वय-52, रा. शालिमार कॉलनी एम आय डि सी उस्मानाबाद ) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार मयत सना इरफान मोमीन (वय -27,  रा.  मोमिन गल्ली शुक्रवार पेठ माढा )  हिचे लग्न झाल्यानंतर  दोन महिन्यापासून तिला नवरा इरफान रजाक मोमीन, सासरा रजाक मकबुल मोमिन, सासू आशिया  रजाक मोमीन यांनी तिला तुझ्या आई-वडिलांनी लग्नामध्ये आम्हाला काही दिले नाही. मान-पान केला नाही म्हणत उस्मानाबाद येथील प्लॉट आमच्या नावावर कर असे म्हणत छळ सुरू केला. त्याचबरोबर तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वेळोवेळी मारहाण केली. सतत  तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्यानंतर तिचा नवरा इरफान रजाक मोमिन याने शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तीला गळा दाबून ठार मारले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे हे करीत आहेत.

2 thoughts on “माढ्यात विवाहित युवतीचा खून

  1. जो तालुका विध्यार्थ्यांना आदर्श आहे त्याच तालुक्यातील ही घटना निश्चितच तालुक्याला धक्का लावणारे असे आहे. योग्य तपास होऊन संबंधितांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे.

  2. लग्नातील मानपान म्हणजे हुंडाच झाला यासाठी हुंडा बंदी कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी

Leave a Reply to Ganesh Kulkarni Cancel reply

error: Content is protected !!