कामासाठी लावलेल्या ट्रॅक्टर ट्रेलरची ८ चाके केली लंपास

भंडीशेगाव येथील प्रकार, ट्रॅक्टर मालकांमध्ये भितीचे वातावरण


पंढरपूर : ईगल आय मिडीया
ऊस गाळप हंगाम सुरू होत असल्याने ट्रॅक्टर मालकांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅलर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. दरम्यान, भंडीशेगाव ( ता. पंढरपूर) परिसरातील दुकानदारांकडून ड्रेसिंग वगैरेचे काम सुरू असताना त्यांना आता वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

भंडीशेगाव येथील श्रीनाथ वेल्डिंग वर्क्स येथून ग्रेसिंग साठी व इतर कामासाठी लावण्यात आलेल्या दोन ट्रेलरची ८ टायर मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसात फिर्याद देण्यात आले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की भंडीशेगाव हद्दीत पुणे- पंढरपूर रोडवर बाळासाहेब मोरे यांचे श्रीनाथ वेल्डिंग वर्कशॉप आहे. याठिकाणी खेड भाळवणी येथील आनंदा घालमे यांनी आपले २ ट्रेलर ग्रेसिंग व इतर कामासाठी पाठवले होते. दुकान परिसरात या दोन ट्रेलर लावण्यात आल्या होत्या.

मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी सदर दोन्ही ट्रेलरच्या सर्व आठ टायर लंपास केल्या. याची किंमत १ लाख २० हजार इतकी असल्याचे घालमे यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिस तपास सुरू आहे.

One thought on “कामासाठी लावलेल्या ट्रॅक्टर ट्रेलरची ८ चाके केली लंपास

  1. अशा चोरट्यांचा सत्कार करावा की शिक्षा द्यावी हेच कळेना. सध्याच्या परिस्थिती पाहता गरीब शेतकर्यांना देखील सोडेना.याचे नवल वाटते.

Leave a Reply

error: Content is protected !!