भंडीशेगाव येथील प्रकार, ट्रॅक्टर मालकांमध्ये भितीचे वातावरण
पंढरपूर : ईगल आय मिडीया
ऊस गाळप हंगाम सुरू होत असल्याने ट्रॅक्टर मालकांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅलर दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. दरम्यान, भंडीशेगाव ( ता. पंढरपूर) परिसरातील दुकानदारांकडून ड्रेसिंग वगैरेचे काम सुरू असताना त्यांना आता वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
भंडीशेगाव येथील श्रीनाथ वेल्डिंग वर्क्स येथून ग्रेसिंग साठी व इतर कामासाठी लावण्यात आलेल्या दोन ट्रेलरची ८ टायर मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसात फिर्याद देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की भंडीशेगाव हद्दीत पुणे- पंढरपूर रोडवर बाळासाहेब मोरे यांचे श्रीनाथ वेल्डिंग वर्कशॉप आहे. याठिकाणी खेड भाळवणी येथील आनंदा घालमे यांनी आपले २ ट्रेलर ग्रेसिंग व इतर कामासाठी पाठवले होते. दुकान परिसरात या दोन ट्रेलर लावण्यात आल्या होत्या.
मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी सदर दोन्ही ट्रेलरच्या सर्व आठ टायर लंपास केल्या. याची किंमत १ लाख २० हजार इतकी असल्याचे घालमे यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलिस तपास सुरू आहे.
अशा चोरट्यांचा सत्कार करावा की शिक्षा द्यावी हेच कळेना. सध्याच्या परिस्थिती पाहता गरीब शेतकर्यांना देखील सोडेना.याचे नवल वाटते.