सेनेच्या दोघांसह 30 खासदार कोरोना पॉझिटिव्ह

राज्यातील सेनेचे दोन खासदार पॉझिटिव्ह

टीम : ईगल आय मीडिया

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी केलेल्या तपासणी मध्ये 30 खासदार पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल मिळाले आहेत. विशेष म्हणजे त्यामध्ये महाराष्ट्रातील शिवसेनेचे दोन खासदार पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली आहे.पहिल्या दिवशी सगळ्या खासदारांची कोविड १९ ची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 30 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.


यामध्ये भाजपच्या खासदार
मीनाक्षी लेखी, अनंतकुमार हेगडे यांच्यासह एकूण 30 खासदारांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये राज्यातील शिवसेनेचे खा.प्रतापराव जाधव, प्रतापराव पाटील – चिखलीकर यांचा समावेश आहे. इतर खासदारांमध्ये प्रवेश साहिब सिंह, सुखबीर सिंह, प्रतापराव जाधव, जनार्दन सिंह, हनुमान बेनीवाल, सेल्वम जी, प्रताप राव पाटिल, रामशंकर कठेरिया, सत्यपाल सिंह यांच्यासह एकूण 30 जणांना करोनाची लागण झाली आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज खासदारांनी अटेंडन्स अॅपद्वारे हजेरी लावली. तसंच त्यांना करोना किटही देण्यात आले. मास्क सॅनेटायझर देण्यात आले. सोमवारी ही सगळी प्रक्रिया खासदारांना समजली. लोकसभेत खासदारांना डेस्कच्या समोर काचेचं आवरणही लावण्यात आलं आहे.

एवढंच नाही तर उभं राहून बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. खासदारांना बसूनच त्यांचं म्हणणं मांडायचं आहे. आज लोकसभेत ३५९ खासदारांची हजेरी होती. पावसाळी अधिवेशनाचा हा पहिला दिवस होता.

दरम्यान सोमवारी
देशभरात करोनाग्रस्तांची संख्या ४८ लाखांच्या पुढे गेली आहे. तर आत्तापर्यंत ३७ लाखांपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तपर्यंत ७८ हजारांपेक्षा जास्त लोकांचा देशभरात करोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ही माहिती दिली आहे.

One thought on “सेनेच्या दोघांसह 30 खासदार कोरोना पॉझिटिव्ह

  1. धक्का दायक बाब असून काळजी घेणे आवश्यक आहे, मास्क आणि सॅनिटायझर वापरून सुरक्षित डिस्टन्सचे पालन करावे लागणार.

Leave a Reply to Santosh Halkude Cancel reply

error: Content is protected !!