30 जून अखेर विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने 174 दर्शन पास रद्द !


पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी 30 जूनपर्यंत बंद राहणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आलेले आहे, त्यामुळे तांत्रिक कारणामुळे ऑनलाइन दर्शन बुकिंग केलेल्या 174 भाविकांचे दर्शन पास रद्द केलेले आहेत अशी माहिती विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी दिली आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी online बुकिंग सेवा मागील 7 वर्षांपासून सुरू आहे, यात्रा आणि गर्दीच्या काळात ही सेवा बंद ठेवण्यात येत असते. सध्या कोरोनाची साथ सुरू असल्याने 17 मार्चपासून विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. तरीही काही भाविकांनी online बुकिंग करून विठ्ठल दर्शनाचे पास घेतलेले आहेत.
यासंदर्भात मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, 17 मार्चपासून श्री विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद आहे, केंद्र सरकारने वेळोवेळी लॉक डाऊन जाहिर केल्यानंतर दर्शन बंदीचा कालावधी वाढवलेला आहे. 1 जून रोजीच मंदिर समितीने 30 जूनपर्यंत दर्शन बंद राहील असे जाहीर केले आहे, मात्र तांत्रिक कारणामुळे मंदिर समितीच्या online दर्शन बुकिंग च्या माध्यमातून 174 भाविकांनी विठ्ठल दर्शन पास काढलेले आहेत. ही बाब निदर्शनास आल्यानंतर मंदिर समितीने 30 जूनपर्यंत मंदिर बंद असल्याने संबंधित भाविकांना दर्शन पास रद्द करण्यात आल्याचे कळवले आहे. तसेच तांत्रिक दुरुस्तीही केलेली असल्याचेही जोशी यांनी या पत्रकात नमूद केले आहे.

2 thoughts on “30 जून अखेर विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने 174 दर्शन पास रद्द !

  1. तांत्रिक कारणामुळे ऑनलाइन दर्शन बुकिंग

Leave a Reply to Ganesh Kulkarni Cancel reply

error: Content is protected !!