पंढरपूर : ईगल आय मीडिया
शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी पातळी सोडून बेताल वक्तव्य केल्यामुळे शिवसैनिकांनी काळे फासलेला भाजप नेता रक्तदाब वाढल्याने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. भाजपचे शहराध्यक्ष विक्रम सिरसट यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
दरम्यान, भाजपचे पंढरपूर शहराध्यक्ष विक्रम सिरसट यांनी, कटेकर यांच्याशी झालेल्या घटनेचा निषेध केला आहे. कटेकर ये अनावधानाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलून गेले, त्याबद्दल लोकशाही मार्गाने त्यांना जाब विचारणे योग्य ठरले असते.मात्र झाला प्रकार चुकीचा असून कटेकर यांची तब्येत त्यामुळे बिघडली असल्याचे शिरसट म्हणाले.
भाजपचे माजी शहराध्यक्ष असलेल्या शिरीष कटेकर यांची शुक्रवारी मोर्चावेळी बोलताना जीभ घसरली आणि त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बेताल टीका केली. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कटेकर यांच्या अंगावर काळे ऑइल ओतले आणि त्यांना साडी, बांगडी चा आहेर दिला.
तसेच या दरम्यान त्यांना धक्काबुक्की झाल्याचेही सांगण्यात येते. कटेकर यांना त्यांच्या घरापासून संत नामदेव महाद्वार येथे आणून माफी मागण्यास भाग पाडले. यानंतर सांयकाळी कटेकर यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना तपासण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. त्यांचा रक्तदाब वाढल्याने तिथून सोलापूर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.