टीम : ईगल आय मीडिया
केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक नेते रामविलास पासवान यांचे आज निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. पासवान यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
उत्तर भारतातील विशेषतः बिहार मधील एक महत्वाचे दलित नेता म्हणून त्यांची ओळख होती. वकिलीचे शिक्षण घेतलेल्या पासवान यांची पोलीस दलात नियुक्ती झाली होती मात्र त्यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात ही पासवान मंत्री होते. तर नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात ही ते मंत्रीपदी होते. लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान हे त्यांचे चिरंजीव आहेत. तर मोदी सरकारमधील या महिन्यात निधन झालेले पासवान हे दुसरे मंत्री आहेत. मागच्या महिन्यात रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाले आहे.
या माजी रेल्वे मंत्र्यांनी जास्त मताधिक्क्याने निवडून येण्याचा विक्रम केला होता. पासवान यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌷🌷