इयत्ता 11 वी प्रवेशासाठी सोलापूर जिल्ह्यात cet नाही

प्रवेशार्थी विद्यार्थ्यांपेक्षा जास्त जागा उपलब्ध

संबंधित वृत्त वाचा

टीम : ईगल आय मीडिया

इयत्ता 10 वी चा निकाल लागल्यानंतर 11 वीच्या प्रवेशासाठी चिंताग्रस्त झालेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी चांगली बातमी असून 11 वी प्रवेशासाठी सोलापूर जिल्ह्यात cet ची आवश्यकता नाही, 10 पास विद्यार्थ्यांपेक्षा जागा जास्त असल्याने पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

ही बातमी सुद्धा वाचा

जिल्ह्यातील एकूण 428 महाविद्यालयापैकी 198 शास्त्र महाविद्यालयात 29 हजार 237, वाणिज्य शाखेच्या 215 महाविद्यालयात 36 हजार 171 तर कला शाखेच्या 112 महाविद्यालयात 11 हजार 328 जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 10 वी पास सर्व विद्यार्थ्यांना विना cet परीक्षा देता 11 वी साठी प्रवेश मिळणार आहे.

यासंदर्भात जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी माहिती दिली आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यात इयत्ता 10 वी च्या परीक्षेत 65 हजार176 विद्यार्थी पास झाले आहेत तर जिल्ह्यात 11 वी प्रवेशासाठी 76 हजार 736 इतक्या जागा उपलब्ध आहेत. पास विद्यार्थ्यांपेक्षा 11 हजाराहून अधिक जागा जास्त असल्याने जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.

3 thoughts on “इयत्ता 11 वी प्रवेशासाठी सोलापूर जिल्ह्यात cet नाही

  1. तरीही सायन्स विभागाकडे कल असणाऱ्यांना योग्य महाविद्यालय मिळेलच याची गॅरंटी नाही यासाठी निदान सायन्स विभागासाठी सीइटी पतीक्षेची गरज होती

    1. त्या विद्यार्थ्यांना cet द्यावी लागेल. ऑनलाइन फॉर्म भरून ठेवा

Leave a Reply to Santosh Halkude Cancel reply

error: Content is protected !!