माजी आम.गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक

सोलापुरात सुरू आहेत उपचार

सांगोला : ईगल आय मीडिया

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे तब्बल 50 वर्षांहून अधिक नेतृत्व केलेले, राज्याच्या राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व मानले गेलेले माजी आमदार गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते .

संबंधित बातमी वाचा !

निधनाचे वृत्त चुकीचे !

माजी आम.गणपतराव देशमुख यांच्या निधनाच्या पोस्ट शोषल मीडियावर दुपारपासून फिरत आहेत. मात्र या पोस्ट आणि संबंधित बातम्या चुकीच्या आहेत आणि आबांची प्रकृती स्थिर आहे, असे जि.प.सदस्य सचिन देशमुख यांनी सांगितले आहे.

त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते. सांगोला या दुष्काळी तालुक्याचे 50 हुन अधिक वर्षे नेतृत्व करून आ.देशमुख यांनी विक्रम केला आहे. त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून समर्थक प्रार्थना करीत आहेत.

2 thoughts on “माजी आम.गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक

Leave a Reply to SAMADHAN VITTHAL KHANDEKAR Cancel reply

error: Content is protected !!