आष्टीत जन्मला एक डोळ्याचा बकरा

मोहोळ : सदाशिव पोरे
आष्टी ( ता. मोहोळ ) येथील श्रवण बाबुराव पवार यांच्या शेळीच्या पोटी एक डोळा असलेला बकरा जन्माला आला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत असून बकरा पाहण्यासाठी लोक येऊ लागले आहेत.
श्रवण पवार हे गेल्या काही आष्टीत राहत आहेत. पारंपरिक व्यवसायाबरोबरच जोडधंदा म्हणून त्यांनी काही शेळ्या पाळल्या  आहेत.


दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजता त्यांच्या शेळीने एक डोळा असलेला बकरा आणि एक बकरी जन्माला घातल्याचे आणि निदर्शनास आले. बकरीला सर्व अवयव व्यवस्थित असून बकऱ्याला मात्र एकच डोळा असल्याचे दिसून आले.


ही घटना वाऱ्यासारखी आष्टी पंचक्रोशीत पसरली. हा विशेष बकरा पाहण्यासाठी बघ्यांची झुंबड ऊडाली होती. या घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

One thought on “आष्टीत जन्मला एक डोळ्याचा बकरा

  1. देवाची करणी आणि नारळात पाणी यालाच म्हणतात

Leave a Reply to Santosh Halkude Cancel reply

error: Content is protected !!