पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 4 हजारांच्या उंबरठ्यावर

मृत्यूची संख्याही शतकाच्या जवळ

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना प्रादुर्भाव दररोज चिंताजनक होऊ लागला आहे. शहर आणि तालुक्यातील एकत्रित रुग्ण संख्या आता 4 हजारांच्या उंबरठ्यावर उभा आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी शतकाच्या अगदी जवळ हा आकडा येऊन ठेपलेला आहे.
पंढरपूर तालुक्यात कोरोना साथीचे जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत उशिरा आगमन झाले. मात्र नंतर अतिशय वेगाने वाढ झाली. सध्या सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुका रुगांच्या संख्येत पहिल्या क्रमांकावर असून मृत्यूची संख्या बार्शीच्या पाठोपाठ शतकाच्या वेशीत पोहोचली आहे.


गुरुवारी शहरात 25 आणि ग्रामीण मध्ये 54 असे 79 नवे रुग्ण सापडले आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील बाधितांची संख्या 3 हजार 945 एवढी झाली आहे. शुक्रवारी 4 हजाराचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. तर मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी गुरुवारी ही संख्या 91 वर गेली असून शतकाच्या अगदी जवळ पोहोचली आहे.

लॉक डाऊन पाळूनही शहरातील रुग्ण संख्या आटोक्यात येताना दिसत नाही. पंढरपूर शहराच्या बरोबरीने तर ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव वेगाने चालू असून शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक रुग्ण संख्या होण्याची शक्यता बळावली आहे.

One thought on “पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 4 हजारांच्या उंबरठ्यावर

  1. प्रशासनाने घालून दिलेल्या आदेशानुसार मास्क, सॅनिटायझर चा वापर करावा तसेच दोघात सुरक्षित अंतर आवश्यक असून गरज असेल तरच घराबाहेर पडले तरच ही महामारी आटोक्यात येईल.

Leave a Reply to Santosh Halkude Cancel reply

error: Content is protected !!