बनावट अकाउंटवरून रिक्वेस्ट आल्यास रिपोर्ट करण्याचं आवाहन
पो नि किरण अवचर यांच्या नावे हे प्रोफाईल पिक्चर असलेलं फेसबुक अकाउंट बनावट आहे
पंढरपूर : ईगल आय मीडिया
सर्व सामान्य नागरिकांचे फेसबुक, बँक अकाउंट हॅक होणं, त्यावरून पैसे गायब होणं नित्याचंच झालेलं असताना आता चक्क पोलीस निरीक्षकांचंच बनावट फेसबुक अकाउंट बनवलं आहे. आणि त्यावरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवुन पैसे मागवले जात आहेत. या अकाउंटवरून 10 ते 15 जणांना पैसे मगितल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी या संदर्भात सूचना केली असून नागरिकांना या अकौंट बाबत सावध ही केले आहे. तसेच सायबर सेलकडे तक्रार ही केली आहे.
तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर यांचे सध्या एक फेसबुक अकाउंट असून शनिवारी त्यांचंच फोटो वापरून दुसरे एक बनावट अकौंट तयार करण्यात आले. त्यावरून अवचर यांच्या मित्र यादीतील लोकांना मेसेंजर वर मेसेज पाठवून पैसे पाठवण्याची मागणी गेली. मोबाईल नंबर देऊन त्यावर पैसे गुगल पे करण्याची विनंती पाठवण्यात आली. संबंधितांनी शंका आल्याने या बाबत अधिक माहिती घेतल्यास हे अकौंट बनावट असल्याचे लक्षात आले.
त्यानंतर पो नि अवचर यांनी आपले अकाऊंट बनावट असल्याचे सांगून लोकांना सावध केले. तसेच यासंदर्भात सायबर सेलकडे याबाबत तक्रार केली आहे. तसेच संबंधित फेसबुक अकौंटवरून रिक्वेस्ट आल्यास ती स्वीकारू नये, आणि रिपोर्ट करावे असे आवाहन केले आहे.
अवचर यांनी आपल्या मूळ अकौंट चे प्रोफाइल छायाचित्र बदलले असून तेच त्यांचे स्वतःचे अकौंट आहे असे सांगितले आहे. तसेच फेसबुक वापरणाऱ्या सर्वांनी आपले अकाउंट बनावट बनवले जाणार नाही याची काळजी घ्यावी, आवश्यक ते सुरक्षा उपाय अवलंबवावेत असेही आवाहन केले आहे.
धक्कादायक बाब आहे