
टीम : ईगल आय मीडिया
पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातील पोस्टल मतांची मोजणी सुरू असून राष्ट्रवादी चे उमेदवार अरुण लाड यांना 12 मतांची आघाडी मिळाल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.मात्र लाड यांना 12 मतांची आघाडी मिळाल्याचे सूत्रांकडून समजते.
पुणे पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपचे संग्राम देशमुख, आणि राष्ट्रवादी चे अरुण लाड, श्रीमंत कोकाटे, रुपाली ठोंबरे, शरद पाटील यांच्यासह 62 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
मतमोजणी चा अंतिम निकाल येण्यास उशीर लागण्याची शक्यता आहेत. पोस्टल मतमोजणी सुरू झाली असून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी चे अरुण लाड यांना 12 मतांची आघाडी मिळाली आहे.
पुणे पदवीधर चे अजून मतदान मोजणी सुरू नाही ,
कोणतेही पोस्टल मतदान मोजले नाही अजून 50 चे गठे बांधणे सुरू आहे त्या नंतर सगळे मतदान एकाच वेळी मोजणार
अफवा मुदाम पसरवतात ,खोटे बोल रेटून बोल चालत नसते मतदान मोजणे 3 वाजता सुरू होईल ,जेवण झाल्यावर
अफवा वरून लक्षात येते सो कॉल कार्यकर्ते म्हणाऱ्यांना अजून प्रक्रिया माहीतच नाही राव
दुर्देव आहे पदवीधरांचे