भाजपचे देशमुख मोठ्या मतांनी पिछाडीवर
टीम : ईगल आय मीडिया
पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातील मतांची मोजणी सुरू असून राष्ट्रवादी चे उमेदवार अरुण लाड यांना 8 हजार मतांची आघाडी मिळाली आहे. विशेष म्हणजे ही आघाडी 40 हजार मतांच्या मोजणीनंतर आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.मात्र लाड यांना 8 हजार मतांची आघाडी मिळाल्याचे खात्रीपूर्वक सूत्रांकडून समजते.
शिक्षकमध्ये आसगावकर आणि अपक्ष दत्तात्रय सावंत यांच्यात जोरदार चुरस असून अल्पशा मतांनी काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर असल्याचे समजते.
पुणे पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू झाली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपचे संग्राम देशमुख आणि राष्ट्रवादी चे अरुण लाड, अपक्ष श्रीमंत कोकाटे, मनसेच्या रुपाली ठोंबरे, शरद पाटील यांच्यासह 62 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मतमोजणी चा अंतिम निकाल येण्यास उशीर लागण्याची शक्यता आहेत.
पोस्टल मतमोजणी झाली असून त्यामध्ये 1200 मतांची आघाडी लाड यांना मिळाल्याची माहिती आहे. तर नुकत्याच मिळालेल्या विश्वसनीय वृत्तानुसार 40 हजार मतांची मोजणी पूर्ण झाली असून राष्ट्रवादी चे अरुण लाड यांनी 8 हजार मतांची आघाडी घेतली आहे. उमेदवार निहाय मिळालेल्या मतांची अकडेवारी लवकरच प्रसिद्ध केली जाईल.
8806434833