109 वी रँक मिळवून झाले उत्तीर्ण
पंढरपूर : ईगल आय मीडिया
खर्डी ( ता . पंढरपूर येथील ) राहुल लक्ष्मण चव्हाण यांनी आय ए एस परीक्षेत 109 वी रँक मिळवली आहे.
शेतकरी कुटुंबातील राहुल चव्हाण यांचे प्राथमिक शिक्षण खर्डी, माध्यमिक शिक्षण कवठेकर प्रशाला आणि महाविद्यालयीन शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात झाले आहे. राहुल चव्हाण यांनी दिल्ली येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास केला आहे. सीताराम महाराज प्रशाला खर्डी येथे झाले. त्यांची एक बहीण राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करीत आहे तर भाऊ बी एस्सी अग्रीचे शिक्षण पूर्ण करून शेती करीत आहेत. प्रगतशील शेतकरी असलेले वडील लक्ष्मण चव्हाण हे शेतकरी संघटनेचे काम करीत असतात.
मंगळवारी आय ए एस परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे, त्यामध्ये राहुल चव्हाण यांनी 109 वी रँक मिळवली आहे. या यशाबद्दल राहुल चव्हाण यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अभिनंदन राहुल चव्हाण