पंढरपूर तालुक्यातील रोहिणी गायगोपाळ ची mpsc परीक्षेत बाजी

नायब तहसीलदार पदाची परीक्षेत मिळवले यश

पंढरपूर : ईगल आय मीडिया

आंबे ( ता.पंढरपूर ).येथील रोहिणी अर्जुन गायगोपाळ या युवतीने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बाजी मारली असून नायब तहसीलदार पदाची परीक्षा यशस्वीरीत्या पास केली आहे.

ही बातमीसुद्धा वाचा !

मूळ आंबे येथील असलेल्या रोहिणी चे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आंबे येथेच झाले आहे. येथील जिजामाता प्रशालेची आदर्श विद्यार्थिनी म्हणून तिने नावलौकिक मिळवला होता. 2017 साली प्रशासनाधिकारी पदाची परीक्षा पास झाल्यानंतर तिने नायब तहसीलदार पदाचे ध्येय बाळगून शासकीय सेवा करीत हे यश मिळवले आहे.

रोहिणी गायगोपाळ सध्या मंगळवेढा नगरपालिकेत प्रशासनाधिकारी म्हणून सेवेत आहे. मात्र नायब तहसीलदार पदाची परीक्षा देऊन तीमध्ये यश मिळवले आहे. या यशाबद्दल रोहिणी गाय गोपाळ हिचे माजी आम.दत्तात्रय सावंत यांनी अभिनंदन केले आहे. तसेच सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे.

One thought on “पंढरपूर तालुक्यातील रोहिणी गायगोपाळ ची mpsc परीक्षेत बाजी

Leave a Reply to Pushkar yuvraj labade Cancel reply

error: Content is protected !!