सांगोला येथील अपघातात पंढरपूर चे तीघे ठार

राजेंद्र शेटे, त्यांच्या अल्पवयीन मुलीसह पत्नीचा अपघाती मृत्यू


सांगोला : ईगल आय मीडीया

सांगोला तालुक्यात झालेल्या अपघातात पंढरपूर येथील राजेंद्र शेटे आणि त्यांच्या पत्नीसह अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. मंगळवार दि.१२ जानेवारी रोजी सायंकाळी 7 वा. च्या समारास घडला आहे. आपल्या कुटुंबासहित आईला भेटण्यासाठी आलेल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सांगोला-पंढरपूर रोड वरील बिलेवाडी पाटीजवळ झालेले अपघात झाला.


सांगोला – पंढरपूर रोड वरील बिलेवाडी पाटी जवळ आयशर टेंपो (क्रमांक – एम एच १०, ए डब्यु ७६४२) बजाज मोटरसायकल (क्रमांक – एम एच १२ डी के – ४०४९) व महिंद्रा कार एक्स यु व्ही (क्रमांक – एम एच १० एल एक्स ३८१) मध्ये तिहेरी अपघात झाला या अपघातामध्ये राजेंद्र निवृत्ती शेटे (वय ३५) व त्यांची मुलगी नंदिनी राजेंद्र शेटे (वय ६), पत्नी अर्चना राजेंद्र शेटे (वय ३०), हे गंभीर जखमी होऊन ठार झाले. मयताची मुलगी स्वरा राजेंद्र शेटे (वय ४) व समृद्धी राजेंद्र शेटे (वय ७) हे जखमी झाले आहेत.

मयत राजेंद्र शेट्टे हे आपल्या पत्नी व मुलींसह हनुमंतगाव (ता. सांगोला) येथे आईला भेटण्यासाठी आले होते. आईला भेटुन शेट्टे पंढरपूरला घरी जात असतानाच बिलेवाडी पाटीजवळ त्यांची मोटरसायकल, आयशर टेम्पो व महिंद्रा कार यांच्यामध्ये भीषण आपघात झाला. या अपघातामध्ये कारमधीलही जखमी झाल्याची माहिती घटनास्थळावरील नागरिक सांगत होते. रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

One thought on “सांगोला येथील अपघातात पंढरपूर चे तीघे ठार

  1. धक्कादायक बातमी आहे वाहने सावकाश चालवीने गरजेचे आहे

Leave a Reply to Santosh Halkude Cancel reply

error: Content is protected !!